Type Here to Get Search Results !

पनवेलकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ? पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा

 पनवेलकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ?
पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा

पनवेल : प्रतिनिधी 



पनवेल महानगरपालिकेकडून मे महिन्यापर्यंत पनवेलमध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे यामुळे पाणीबाणी निर्माण झाली आहे. मात्र येणाऱ्या पाण्यात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पनवेलमधील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा महापालिका देत आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. यामुळे पनवेलच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नळाला गढूळ पाणी

आल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे. 

     पनवेलच्या कापड बाजार,भुसार मोहल्ल्यात दूषित पाणी पुरवठा होत असून महानगरपालिका

प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने कापड बाजार - भुसार मोहल्ल्यातील नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण होत आहे.

          भुसार मोहल्या येथे राहणारे जयेश लखपती हे नळाला आलेले काळे पाणी घेऊन पालिका कार्यालयात गेले असता पालिका कार्यालय बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

    त्यामुळे नळाला येणाऱ्या काळात शुद्ध पाणी येईल का? असा सवाल नागरिक करीत आहेत.