स्मार्ट मॉमीसचा 7 वा वर्धापन दिन साजरा
पनवेल : पनवेल स्मार्ट मॉमीसच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे FUSION पैठणी 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. प्रीतम म्हात्रे यानी पनवेल स्मार्ट मॉमीसच्या अध्यक्षा शितल ठक्कर आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पनवेल शहरातील अनेक महिला सहभाग घेतला तसेच पनवेल स्मार्ट मॉमीस यांनी कष्ट करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांचे सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आले.
या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत ममता प्रितम म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मा.नगरसेविका प्रीती जॉर्ज, वर्षा प्रशांत ठाकूर, पनवेल अर्बन बँकेच्या मा.संचालिका माधुरी गोसावी, सुजाता ठक्कर,सोमण मॅडम, पनवेल स्मार्ट मॉमीसच्या अध्यक्षा शीतल ठक्कर, मेघना भानुशाली, कविता ठाकूर, नैना बांठीया, नीता कोटक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

