Type Here to Get Search Results !

क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृहामध्ये हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न*

 *क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृहामध्ये हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न*



 *क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित 'जनाधर्मा आधारगृह' व* *'यशकल्प फाऊंडेशन'* यांच्या संयुक्त विद्यमाने *रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३* रोजी पनवेल तालुक्यातील *'जनाधर्मा आधारगृह सांगटोली' येथे* हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न झाला. 


हळदीकुंकू म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं मानलं जातं; परंतु हा कार्यक्रम थोडा वेगळा होता. समाजात आज वृद्धाश्रमाच्यापुढे जाऊन परावलंबी वृद्धांसाठी आधारगृहांची निर्मिती करावी लागली. भारतीय संस्कृतीने चालणाऱ्या समाजाची समीकरणे बदलली; परंतु वास्तवादी परिस्थितीचा वेध घेत परिवारापासून दूर असलेल्या वृद्धांना आनंदी ठेवण्यासाठी वेगळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 


गुरु कदम प्रस्तुत *'चला जिंकूया पैठणी'* या खेळाने कार्यक्रमात आनंदाचा, उत्साहाचा परमोच्च बिंदू गाठला. यात तृप्ती निलेश फडके (प्रथम), आरती गिरीश फडके (द्वितीय) व ममता रसिक पाटील (तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. 


यावेळी जे.एम.म्हात्रे चरिटेबल ट्रस्टच्या संचालिका ममताताई म्हात्रे, अंकिता मुंबईकर, शिवसम्राट साप्ताहिकाच्या उपसंपादिका सुनंदा पाटील, द्वारकादास साडी सेंटरच्या संचालिका प्रीती शेळके, डी.डी. विसपुते कॉलेज डी.एडच्या प्राचार्या कुसुम मधाळे, प्राथ. शाळा भानघरच्या मुख्या. योगिनी वैदू, स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम, कळंबोली शहर अध्यक्षा मनिषताई निकम, स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या शितल दिनकर, श्रद्धा इंगळे, शुभंगी निर्मळे, मनीषा म्हात्रे, पत्रकार पनवेल वार्ता संपादिका रुपालीताई शिंदे, पत्रकार आजची उद्योग नागरी संपादिका रुपाली वाघमारे, नंदा म्हात्रे, सामाजिक विकास संस्थेच्या संचालिका लक्ष्मी भोपी, वाजे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पाटील आदी मंडळी उपस्थित होती. 


या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महाराष्ट्र वस्त्रदालन द्वारकादास शामकुमार - शाखा पनवेल यांच्यावतीने पैठण्या देऊन या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. 


यावेळी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष भोपी, शिवसम्राट साप्ताहिकेचे संपादक श्री.रत्नाकर पाटील, पत्रकार श्री.विजय मात्रे गुरू कदम यासह परिसरातील ७० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. 


कार्यक्रमाचे आयोजन यशकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिडये, क्षितिज पर्व फाउंडेशनच्या उपाध्यक्ष माई कलोते, कार्याध्यक्ष दिपाली पारसकर, सचिव विनिता कदम यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशकल्प फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त श्री.यशवंत बिडये व क्षितिज पर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष सनिप कलोते यांनी सहकार्य केले.

या संपूर्ण कार्यक्रमाला जनाधर्मा आधारगृहाचे सर्वेसर्वा श्री. रामा कलोते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.