डॉ.मुनीर तांबोळी व डॉ. श्रेयस ठाकूर यांच्या प्रयत्नाने वडघर पुलाजवळील रस्ता खड्डेमुक्त .
सिडको, विमानतळ प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा करून डांबरीकरण करण्यात आले
पनवेल, प्रतिनीधी -
वडघर पुलाजवळ खड्यांमुळे वाहतूक कोंडी होत होती, शाळेत जाणारे विद्यार्थी, कामाला जाणारे नागरीक अनेकदा या वाहतूक कोंडीत अडकून पडत असत. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदुस्तान 24 तास न्युज चॅनलचे मुख्य संपादक डॉ.मुनीर तांबोळी यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाले यांना संपर्क करून वाहतूक कोंडी बाबत चर्चा करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढला. त्यावेळी चर्चे दरम्यान संजय नाले यांनी पुलाजवळ पडलेल्या खड्यांमुळे वाहतूक कोंडी होते असे सांगितले. डॉ.मुनीर तांबोळी, डॉ. श्रेयस ठाकूर यांनी सिडको व विमानतळ प्राधिकरण यांना संपर्क करून खड्डे बुजवण्याबाबत सांगितले.नाहीतर रस्ता बंद आंदोलन करू असा इशारा दिला.दोन दिवसातच याची दखल घेत वडघर पुला पासून पुढील रस्त्यावरील खड्डे बुविण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी डॉ.मुनीर तांबोळी, डॉ. श्रेयस ठाकूर यांनी स्वतः उपस्थित होते.
या बाबत हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनल ने बातमी प्रसिध्द करून या विषयाला वाचा फोडली होती. वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर खड्डे मुक्त रस्ता केला.त्यावेळी बोलताना डॉ.मुनीर तांबोळी म्हणाले की, खड्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची आणि त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत असे. आत्ता खड्डे भरण्यात आले असून यापुढे वाहतूक कोंडी होणार नाही तसेच दुसरा पुल बंद असून एका पुलावरून वाहतूक सुरू आहे. जीर्ण पुलाच्या जागी नवीन पुल बांधावा यासाठी आम्ही मागील दोन वर्षापासून सिडकोकडे पाठपुरावा करत आहोत.आता नवीन पुलासाठी लवकरच आंदोलन करणार आहोत.


